शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दम असेल तर मैदानात या; सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:01 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सदाभाऊ खोत आक्रमक

परभणी: चिलटासारखं आंदोलन काय करता, दम असेल तर मैदानात या, असं खुलं आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना दिलं आहे. आज परभणीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आंदोलन केलं. टोमॅटोला कमी भाव मिळत असल्यानं स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी खोत यांचा निषेध नोंदवला होता. यावरुन खोत यांनी थेट राजू शेट्टी यांनाच आव्हान दिलं आहे. राजू शेट्टींनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर 15 वर्षे टीका केली, त्यांच्याच गळ्यात गळ्यात घालून सध्या ते फिरताहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. 'राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आंदोलनं केली. त्यावेळी झालेल्या पोलीस कारवायांमध्ये शेतकरी जखमी झाले. मावळमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शेतकऱ्यांनी संघर्ष केला, त्याच पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राजू शेट्टी करत आहेत. शेतकऱ्यांच्या रक्तानं माखलेल्या नेत्यांसोबत आघाडी करण्याची तयारी शेट्टींनी सुरू केली आहे,' असं टीकास्त्र खोत यांनी सोडलं. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचीही खिल्ली उडवली. चिलटासमोर आंदोलन काय करता. दम असेल तर मैदानात या, असं खुलं आव्हान त्यांनी शेट्टींना दिलं. वेळ, काळ, स्थळ ठरवा. मैदानात दोन हात करा, असं खोत म्हणाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सदाभाऊ खोत आज परभणीत आले होते. विद्यापीठातील समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आपला निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस