साता-यात धारदार शस्त्राने भोसकून लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 13:46 IST2017-04-13T13:46:59+5:302017-04-13T13:46:59+5:30

कौटुंबिक वादातून एकाने सख्ख्या धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे.

Sada-in-arms killed by a sharp weapon, and a younger brother's blood | साता-यात धारदार शस्त्राने भोसकून लहान भावाचा खून

साता-यात धारदार शस्त्राने भोसकून लहान भावाचा खून

>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 - कौटुंबिक वादातून एकाने सख्ख्या धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. क-हाड तालुक्यातील चिंचणी-हेळगाव येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली. सागर अंकुश शिराळे (वय २७) असे खून झालेल्याचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचणी येथे शिराळे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. गुरुवारी पहाटे कुटुंबीय झोपेत असताना सागर व जीवन या भावांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यावेळी जीवनने धारदार शस्त्राने सागरला भोकसले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी क-हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी सागर शिराळे याच्यावर मसूर पोलिस दूरक्षेत्रात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Sada-in-arms killed by a sharp weapon, and a younger brother's blood