काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या १२ कमिट्या बरखास्त

By Admin | Updated: July 11, 2017 05:57 IST2017-07-11T05:57:27+5:302017-07-11T05:57:27+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निष्क्रियतेवरून सर्वत्र टीका होऊ लागताच प्रदेश काँग्रेसने सोमवारी तातडीने विविध १२ कमिट्या बरखास्त करून टाकल्या

Sacked 12 Committees by Congress State President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या १२ कमिट्या बरखास्त

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या १२ कमिट्या बरखास्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निष्क्रियतेवरून सर्वत्र टीका होऊ लागताच प्रदेश काँग्रेसने सोमवारी तातडीने विविध १२ कमिट्या बरखास्त करून टाकल्या. या कमिट्यांच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सगळी पदे रिक्त झाली आहेत. ही माहिती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत येणारे नागरी विकास, निराधार व निराश्रित व्यक्ती विकास, असंघटित कामगार सेल, भटक्या जाती व विमुक्त जमाती, सफाई कामगार सेल, सामाजिक न्याय विभाग, उच्च तंत्रशिक्षण सेल, शिक्षक सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सांस्कृतिक विकास सेल, रोजगार व स्वयंरोजगार सेल, कच्छी गुजरात सेल या बारा विभागांचा समावेश आहे.
सर्व सेलच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सर्व पदे रिक्त झाली आहेत. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जातील तसेच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गणेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sacked 12 Committees by Congress State President