शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 9:15 PM

रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे.

मुंबई - एलफिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील लोकल प्रवाशांच्या समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. सचिनने मुंबईतील पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी आपल्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये निधी दिला आहे. मुंबईकर असलेल्या सचिनने यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून, त्यात या निधीबाबत तपशील दिला आहे.  मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निधीची तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. यामधील एक कोटी रुपये पश्चिम रेल्वेवरील पादचारी पुलांसाठी तर एक कोटी रुपये मध्य रेल्वेवरील पादचारी पुलांसाठी देण्यात यावेत असे सचिनने आपल्या पत्रात सांगितले आहे. 

कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने 29 सप्टेंबर रोजी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 22 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना ठरली होती. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरMumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकलElphinstone Road Stationएल्फिन्स्टन स्थानकcentral railwayमध्ये रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे