शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 10:22 IST

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sachin Waze On Jayant Patil :  अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला होता असा आरोप सातत्याने अनिल देशमुख करत होते. त्यानंतर आता बडतर्फ अधिकारी सचिन वाझेने धक्कादायक आरोप केले आहेत. वाझेने आता शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीचेही नाव खंडणी प्रकरणात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

कथित १०० कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. रुग्णालयात नेत असताना सचिन वाझेने एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत गंभीर आरोप केले. मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणात सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. त्यानंतर आता सचिन वाझेने अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप केले. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने केला. अशातच अनिल देशमुखांवर आरोप करताना सचिन वाझेने शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचाही उल्लेख केला आहे. अनिल देशमुखांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना लिहिलेला पत्रात जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचा दावा सचिन वाझेने केला.

"जे काही आहे, त्याचे पुरावे आहेत. सगळे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएच्या माध्यमातून दिले जात होते. आणि सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. सगळे काही त्यांच्या विरोधात गेलेले आहे. सगळे पुरावे त्यांना दिले आहेत. मी सर्व पुरावे पाठवले आहेत", असे वाझे म्हणाला. त्यानंतर यात आणखी कुणाचे नाव आहे का?, असा सवाल वाझेला विचारण्यात आला. त्यावर वाझेने, पत्र लिहिले आहे, त्यात जयंत पाटील यांचे नाव लिहिलेले आहे, असं म्हटलं.

वाझेने जयंत पाटील यांचेही नाव घेतल्याने आता खळबळ उडाली आहे. वाझे याने जयंत पाटील यांचे नाव का घेतलं हे आता देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रातून समोर येणार आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस