सचिन शेळके खुनातील आरोपींच्या कोठडीत वाढ

By Admin | Updated: November 2, 2016 01:31 IST2016-11-02T01:31:58+5:302016-11-02T01:31:58+5:30

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणात सात आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी वाढ करण्यात आली

Sachin Shelke murder case: | सचिन शेळके खुनातील आरोपींच्या कोठडीत वाढ

सचिन शेळके खुनातील आरोपींच्या कोठडीत वाढ


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणात सात आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी वाढ करण्यात आली असून, त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
रूपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, ता. मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई , ता. मावळ), पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (वय ३३, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), सूरज विलास गायकवाड (वय २२, रा. ठाकरवाडी, इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर (वय २२, रा. भांबोली, ता. खेड) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या सातही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींना पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सकाळी (१६ आॅक्टोबर) येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची हत्या केली होती. (वार्ताहर)

Web Title: Sachin Shelke murder case: