साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांचा राजीनामा
By Admin | Updated: July 10, 2017 04:35 IST2017-07-10T04:35:19+5:302017-07-10T04:35:19+5:30
साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी रविवारी आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा विधी व न्याय विभागाकडे दिला.

साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी रविवारी आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा विधी व न्याय विभागाकडे दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी भेटीवर आले होते़ फडणवीस यांनी तांबे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर २४ तासांच्या आत तांबे यांनी विधी व न्याय विभागाकडे राजीनामा पाठवला आहे. तांबेंसह काही विश्वस्तांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले आहे़