सबनीस, मॉर्निंग वॉकला जात चला !

By Admin | Updated: January 7, 2016 02:12 IST2016-01-07T02:12:07+5:302016-01-07T02:12:07+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वादात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना निनावी

Sabnis, Morning Walk! | सबनीस, मॉर्निंग वॉकला जात चला !

सबनीस, मॉर्निंग वॉकला जात चला !

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वादात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना निनावी फोनवरून धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी टिष्ट्वट करीत ‘सबनीस तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला’, असे म्हटले आहे. सनातनचा सबनीसांना हा सल्ला आहे की, गर्भित इशारा, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
सबनीस यांनी चारच दिवसांपूर्वी पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली होती. त्यांना यापूर्वीच उमरगा येथील कार्यक्रमामध्ये धमकीचे फोन आलेले होते. तसेच भाजपाचे खासदार अमर साबळे यांनीही सबनीस यांना संमेलनस्थळी पाऊल ठेवू न देण्याचा इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सनातनचे हे टिष्ट्वट म्हणजे सबनीस यांना घाबरवून सोडण्याचाच प्रकार आहे, असे मानले जाते. पूनाळकर यांनी मात्र या टिष्ट्वटकडे धमकी म्हणून पाहणे चुकीचे असल्याचे सांगून सबनीस यांनी प्रसन्न राहवे, यासाठी आपण त्यांना मॉर्निंग वॉकचा सल्ला दिला असल्याचे सांगितले.

Web Title: Sabnis, Morning Walk!