शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 19:45 IST

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणमुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसंभाजी बिडी प्रकरणी साबळे वाघिरे उद्योग समूहावर गुन्हा दाखल 

नारायणगाव : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने साबळे आणि वाघिरे कंपनीने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत , अशी मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

खा. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की , छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे. साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन सदर विडीचे नाव बदलण्याची विनंती केली. परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडी सारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी  नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळेच राज्य शासनाने  कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत , अशी मागणी खा . कोल्हे यांनी केली आहे .

संभाजी बिडी प्रकरणी साबळे वाघिरे उद्योग समूहावर गुन्हा दाखल  व्यसनाचा पदार्थ असलेल्या विडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले होते. या संघटनेतील काही पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे व वाघिरे व्यवसाय समुहाच्या संचालक आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे... 

टॅग्स :narayangaonनारायणगावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड