शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 17:51 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

S. Jaishankar on Mumbai 26/11 Attack : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भविष्यात असा हल्ला झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल', असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

मुंबईत रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, 'जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो, तेव्हा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा अर्थ होतो. मुंबई हे केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दहशतवादविरोधी प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असताना भारताने दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला होता, तिथेच समितीची बैठक झाली होती.'

परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, 'भारत जगातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. दिवसा एक काम अन् रात्री दहशतवादी कारवाया, असे आता चालणार नाही. भारत आणि चीन लवकरच लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त सुरू करतील. सीमेवरील परिस्थिती एप्रिल 2020 पूर्वीसारख होईल', अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई 26/11 हल्ला26 नोव्हेंबर 2008 साली भारताची आर्थित राजधानी मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाचे दहा दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत घुसले आणि मुंबईतील ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी अंदाधूंद गोळीबार केला होता. त्या घटनेत 20 जवान आणि 26 परदेशी नागरिकांसह किमान 174 भारतीयांचा मृत्यू झाला होता. तसेच, 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबई