शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये हजारो महाराष्ट्रीयन विद्यार्थी, नागरिक अडकले; मुख्यमंत्री ठाकरेंच्या महत्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:33 IST

Russia-Ukraine War: रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जगभरावर उमटताना दिसत आहेत. युक्रेनमधील नागरिक जीव मूठीत घेऊन घरात आसरा घेऊन आहेत. तर परदेशातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, नागरिक मायदेशात परतण्यासाठी धडपड करत आहेत.

Russia-Ukraine War: रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जगभरावर उमटताना दिसत आहेत. युक्रेनमधील नागरिक जीव मूठीत घेऊन घरात आसरा घेऊन आहेत. तर परदेशातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, नागरिक मायदेशात परतण्यासाठी धडपड करत आहेत. यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्याही सुखरूप सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. 

"युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत", अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय अडकलेयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. तसंच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झालं. पण रशियाकडून आज युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर युक्रेनकडून हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशियाकडून सातत्यानं लढाऊ विमानांच्या घिरट्या युक्रेनवर सुरू आहेत. तसंच काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. यात आता भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेलाही ब्रेक लागला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र