वसईत सापडला लाखो रुपये किमतीचा साप
By Admin | Updated: October 9, 2016 18:06 IST2016-10-09T18:06:27+5:302016-10-09T18:06:27+5:30
नायगाव पूर्व भागातील वाकीपाडा या पाझर तलावाजवळ रेड सॅन्ड बोआ जातीचा बिनविषारी व अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा साप सापडला

वसईत सापडला लाखो रुपये किमतीचा साप
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 9 - नायगाव पूर्व भागातील वाकीपाडा या पाझर तलावाजवळ रेड सॅन्ड बोआ जातीचा बिनविषारी व अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा साप सापडला आहे. वसई तालुक्यात या जातीचा साप पहिल्यांदाच आढळून आल्यानं सर्पमित्रांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या सापाची किंमत लाखोंच्या घरात आहे. या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी पाझर तलावाजवळ गर्दी केली होती. नायगाव पूर्व येथील आमची वसईचे सदस्य आणि सर्पमित्र संकेत पाटील यांनी या सापास पकडून वनखात्यास सूचित करून तुंगारेश्वर अभयारण्यात सुखरूप सोडले आहे.