'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:05 IST2026-04-11T17:02:43+5:302026-04-11T17:05:48+5:30

Sunetra Pawar Rupali chakankar: अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. 

'Rupali Chakankar threatens Sunetra Pawar's life', complaint to SIT, stir in politics | 'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ

'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक तक्रार एसआयटीकडे आली आहे. या तक्रारीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडूनच असल्याचा आरोप केला गेला आहे. बीडमधील व्यक्तीने ही तक्रार केली असून, एसआयटीकडून या तक्रारीचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एसआयटीकडे ही तक्रार केली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका वादात राहिली आहे. त्यातच आता नव्या तक्रारीने राजकारणात खळबळ उडाली आहे. 

रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे या व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत आणखी कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला गेला आहे आणि तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

तक्रारीत किती तथ्य आहे? खोडसाळपणातून ही तक्रार केली गेली आहे का? याचा तपास एसआयटी करणार आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सुनेत्रा पवारांची काळजी घेऊ

या तक्रारीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी घेऊ. महाराष्ट्राचं पोलीस खाते काळजी घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचे पक्ष असेल, जे काही येत असेल त्याची चौकशी केली जाईल. पण, योग्य सुरक्षा तर आहेच. 

Web Title : सुनेत्रा पवार के जीवन को रूपाली चाकणकर से खतरा, एसआईटी जांच शुरू

Web Summary : एसआईटी में दर्ज शिकायत के अनुसार, रूपाली चाकणकर से सुनेत्रा पवार के जीवन को खतरा है। बीड निवासी के दावे के बाद जांच जारी है। मुख्यमंत्री ने सुनेत्रा पवार की सुरक्षा का आश्वासन दिया।

Web Title : Sunetra Pawar's life threatened by Rupali Chakankar, SIT investigates complaint.

Web Summary : A complaint filed with the SIT alleges Rupali Chakankar threatens Sunetra Pawar's life. The investigation is underway after a Beed resident's claim. CM assures Sunetra Pawar's safety.