धावत्या मालगाडीतील कोळसा पेटला!

By Admin | Updated: May 29, 2017 00:56 IST2017-05-29T00:56:47+5:302017-05-29T00:56:47+5:30

बोरगाव मंजू :(अकोला) उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बोगीला आग लागल्याची घटना २८ मे रोजी बोरगाव मंजू येथील स्टेशनवर समोर आली.

Running cargo charcoal burns! | धावत्या मालगाडीतील कोळसा पेटला!

धावत्या मालगाडीतील कोळसा पेटला!

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू :(अकोला) उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बोगीला आग लागल्याची घटना २८ मे रोजी बोरगाव मंजू येथील स्टेशनवर समोर आली. बोगीतून धूर निघत असल्याचे बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही बाब रविवारी दुपारी उघडकीस आली. अग्निशामक दलास पाचारण करून पेट घेतलेल्या कोळसा विझविण्यात आला. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
उमरेड येथून नाशिककरिता कोळसा वाहून नेणारी मालगाडी धावत होती. दरम्यान, या गाडीच्या एका बोगीमधून धूर निघत होता. सदर प्रकार रेल्वे स्टेशनवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना दिसताच ताबडतोब मालवाहू गाडी थांबविण्यात आली, तसेच विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी तातडीने अकोला येथून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाने बोगीतील पेट घेत असलेला कोळसा विझवल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, गत दोन महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे.

Web Title: Running cargo charcoal burns!