शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

रात्रभरात ३,०६२ बस गाड्यांवर आरटीओची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 04:15 IST

२१३ बसेस ताब्यात; खासगी बसेस चालकांचे धाबे दणाणले, रात्रीची सर्वात मोठी कारवाई

नागपूर /मुंबई : राज्यात शुक्रवारी रात्री एकाचवेळी विविध ठिकाणी ३,०६२ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली असून २१३ बसेस ताब्यात घेण्यात आल्या. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेसाठी राज्यातील ५० आरटीओ कार्यालयातील ६२३ कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. सर्वाधिक ठाणे विभागात ५३९ बसवर कारवाई झाली असून, ३२ बस जप्त करण्यात आल्या. मुंबईत एकूण २२३ बसवर कारवाई करण्यात आली असून, ९ बस जप्त करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाची धास्ती कमी होताच, खासगी बसेसची रहदारीही वाढली. यामुळे खासगी बसेसच्या समस्यांचा पाढा वाचला जात होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या खासगी बसेस विशेष तपासणी मोहिमेत परिवहन आयुक्त कार्यालयासह १५ प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा सहभाग होता. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा असा ‘ड्राईव्ह’ हाती घेण्यात येईल.- डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त अशी झाली कारवाईकार्यालय    कारवाई    ताब्यात बसेस मुंबई/पनवेल     ४९०    १७ठाणे    ५३९    ३२     पुणे    ४७२    ४३ कोल्हापूर    ३०१    १७ लातूर    १६३    २५ नांदेड    ७०    १० अमरावती    २१६    २५ नाशिक    १३८    १२ धुळे    २०९    ७औरंगाबाद    १४२    १५ नागपूर जिल्हा    ३३१    १०‘या’ अनियमिततांची झाली तपासणीतपासणीत विनापरवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदींची तपासणी, वाहनांमधील बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर व जादा भाडे आकारणे आदींची तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस