शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

RTE Maharashtra Result 2026: आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर; निवड यादी कशी पाहायची? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:53 IST

RTE Maharashtra Admission 2026: आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला १ किलोमीटर अंतराची अट घालण्यात आल्यामुळे अर्ज नोंदणीवर परिणाम झाला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अट मागे घेण्यात आली. परिणामी राज्यभरातील ८,७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी तब्बल ३ लाख ९० हजार अर्ज दाखल झाले आहेत. ही सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडली असून, शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी आता अधिकृत पोर्टलवर उपलब्ध होत आहे. तसेच सोडत प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन ई-मेलद्वारे तक्रार नोंदवावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

आरटीई ऑनलाइन प्रवेश निवड यादी कशी तपासायची? (Maharashtra RTE Merit List 2026)

लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्याचे नाव निवड यादीत आहे की नाही, हे खालील पद्धतीने तपासता येईल:

१) अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी student.maharashtra.gov.in या पोर्टलवर जा.

२) Application Status: होमपेजवर असलेल्या 'Application Status' किंवा 'RTE Results' या पर्यायावर क्लिक करा.

३) नोंदणी क्रमांक टाका: तुमच्या पाल्याचा अर्ज नोंदणी क्रमांक (Application Number) प्रविष्ट करा.

४) यादी डाऊनलोड करा: जिल्ह्यानुसार जाहीर झालेली 'Selection List' किंवा 'Waiting List' डाऊनलोड करून त्यामध्ये नाव तपासा.

५) SMS अलर्ट: निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे देखील कळवले जाईल.

प्रवेशासाठी महत्त्वाचे नियम आणि कागदपत्रे

  • शाळा निवडीची अट: यंदा १ किमी अंतराची अट रद्द झाल्यामुळे पालकांनी १ किमी, १ ते ३ किमी आणि ३ किमी पेक्षा जास्त अंतरावरील शाळांची निवड केली आहे.

  • कागदपत्र पडताळणी: निवड झाल्यानंतर विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

  • रहिवासी पुरावा: रहिवासी पुराव्यासाठी आता गॅस बुक (Gas Book) ग्राह्य धरले जाणार नाही. त्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (Nationalized Bank Passbook) आवश्यक आहे.

  • दिव्यांग विद्यार्थी: दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केला असल्यास किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Maharashtra Result 2026: Lottery announced; How to check selection list?

Web Summary : Maharashtra RTE 2026 lottery announced! 3.9 lakh applications received for 1.14 lakh seats across 8,701 schools. Check the selection list on student.maharashtra.gov.in. SMS alerts will also be sent. Ensure document verification; gas book is no longer valid as residence proof, nationalized bank passbook is required.
टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणResult Dayपरिणाम दिवस