शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एक जागा मुंबईतली, एक बाहेरची... छोट्या-मोठ्या भावांकडे मागणी आठवलेंची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:29 IST

शिवसेना, भाजपाकडे रिपाईंची नवी मागणी

मुंबई: शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी एनडीएकडे दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत कायम राहू. मात्र आम्हाला दोन जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी केली. शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाईंसाठी सोडावी, असं आठवलेंनी म्हटलं आहे. 'रिपाईंच्या काही मागण्यात आहेत. लोकसभेच्या 2 जागा आम्हाला हव्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा आमच्यासाठी सोडावी. यातील एक जागा मुंबईतली असावी आणि दुसरी मुंबईबाहेरची असावी,' अशी मागणी आठवलेंनी केली. त्यामुळे आता युतीमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन घमासान होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेनं गेल्याच आठवड्यात युतीची घोषणा केली. या चर्चेत आपल्याला विश्वासात घेण्यात आलं नाही, असं म्हणत आठवलेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजपा 25 जागा लढवेल, अशी घोषणा भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. या जागावाटपावर आठवलेंनी आक्षेप घेतला होता. भाजपा आणि शिवसेनेनं रिपाईंवर अन्याय केल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती. 'युतीच्या वाटाघाटीत दोघांच्याच जागा वाटपावर तोडगा निघाला आहे. आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. तसंच बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही,' असं आठवलेंनी चारच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. यानंतर आज त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं प्रमुख कार्यंकत्याबरोबर चर्चा केली.रिपाईंनं दोन जागांची मागणी केली असताना महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं भाजप-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला 5 जागा देण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या 5 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mumbaiमुंबई