रोशन बेग यांचे विधान असंसदीय : चंद्रकांत पाटील
By Admin | Updated: May 24, 2017 17:36 IST2017-05-24T14:12:05+5:302017-05-24T17:36:56+5:30
तीन पानी पत्र कर्नाटकच्या मंत्र्यांना

रोशन बेग यांचे विधान असंसदीय : चंद्रकांत पाटील
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्राबद्दल जी विधाने केली आहेत ती असंसदीय आहेत, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुनावले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा समन्वयक मंत्री म्हणून याबाबत दखल घेत कार्यवाही सुरू आहे, असे सांगून चंद्रकांतदादा म्हणाले, बेग यांच्या विधानाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन पानी पत्र कर्नाटकच्या मंत्र्यांना पाठवले आहे.
कर्नाटकला आम्ही पाणी सोडतो, तिथल्या रूग्णांना आरोग्य सेवा देतो. आपण सर्व भारतीय एक आहोत, असे असताना अशी विधाने करणे संयुक्तिक नाही. एकीकडे न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना अशी विधाने करू नयेत यासाठी आवश्यक त्या सुचना या पत्राच्या माध्यमातून कर्नाटककडे करण्यात आल्या आहेत.