शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar: रोहित पवारांचा गनिमी कावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची धमकी धुडकावत बेळगावात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 10:44 IST

Rohit Pawar: बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मई यांनी इशारा दिला होता. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले आहेत.

बेळगाव - गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न पेटला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मई यांनी इशारा दिला होता. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे. सीमावादावरून वातावरण तापलेले असताना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री धमक्या देत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे बेळगावात दाखल झाल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात रोहित पवार यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना सर्वांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेशी मी सहमत आहे,असे रोहित परावर यांनी सांगितले.

दरम्यान, सीमावाद पेटल्यानंतर कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड झाल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कर्नाटकला इशारा दिला होता.  संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानानंतर रोहित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाराष्ट्राच्या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात दिसेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं  होतं.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र