शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:54 IST

शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलै २०२५ रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठीप्रेमी सहभागी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत सूचक ट्वीट केले आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव वादाचा विषय ठरला आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यापासून सर्वसामान्य मराठी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

रोहित पवारांचे ट्विट"मराठी साठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस हा मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल", अशा शब्दात रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

राज ठाकरे काय म्हणाले?राज ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल."

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण