शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ आणि रोहित लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:51 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम

मुंबई: पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. या चर्चेला शरद पवार यांनी अखेर पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे पक्षानं संधी दिल्यास मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं विधान अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी कालच केलं होतं. पार्थ अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. पक्षानं आदेश दिल्यास मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहू, असं त्यांनी कालच म्हटलं होतं. मावळ मतदारसंघाचा भाग असलेला पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात अजित पवारांना मोठं पाठबळ आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकला असता. त्यामुळे पार्थ राजकीय आखाड्यात उतरणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी पार्थ निवडणूक लढवणार नसल्याचं आज जाहीर केलं. आपल्याला राज्यापेक्षा केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे, असं पार्थ कालच म्हणाले होते. केंद्रात गेल्यास राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटलं होतं. जर पक्षानं यंदाच्या निवडणुकीसाठी इतर दुसऱ्या कार्यकर्त्याला मावळमधून उमेदवारी दिल्यास २०२४ च्या निवडणुकीपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे. त्यावेळी वयही माझ्या बाजूने असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार हेदेखील गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करताना रोहित यांनी त्यांची भेट घेतली होती. सध्या त्यांच्याकडे इंडियन शुगर असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस