शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:43 IST

Rohini Khadse And Pranjal Khewalkar : रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आलं आहे. खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह ७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आलं. याच दरम्यान पतीच्या अटकेवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आता मौन सोडलं आहे. 

रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र!" असं म्हणत रोहिणी यांनी आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजन खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याने केले होते. 

"दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ खडसे यांनी देखील जावयाच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली. "सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं हे चुकीचं होईल. त्यामुळे नंतर मी पत्रकार परिषद घेईन. तथ्य समोर येईल. यामध्ये जावई असो किंवा कोणीही असो जर दोषी असेल तर शासन झालंच पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊद्या. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही" असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."

कोण आहे प्रांजल खेवलकर? 

प्रांजल खेवलकर हा शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे.  

आरोपी प्रांजल खेवलकर याच्यासह सातही आरोपींना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. खेवलकरच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं की, आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही किंवा त्यांच्याकडे अमली पदार्थ मिळालेला नाही. द्वेषापोटी त्यांना गुन्ह्यामध्ये घेतलं आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या सात जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत  ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग सत्र न्यायाधीश एन. बी. बारी यांनी दिला.  

टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेeknath khadseएकनाथ खडसेCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिस