प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी

By Admin | Updated: March 6, 2017 02:59 IST2017-03-06T02:59:48+5:302017-03-06T02:59:48+5:30

विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे.

The Rocket of the proposed Virar-Alibaug Corridor | प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी

प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी


नवी मुंबई : रस्तेवाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे १२६ कि.मी. लांबीच्या या मार्गालगत व परिसरात मागील काही वर्षांत हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कॉरिडोरच्या कामाला खीळ बसल्याने नियोजित विकास रखडला आहे. तसेच त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक धूळखात पडून आहे. या पार्श्वभूमीवर या बहुद्देशीय कॉरिडोरचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २0१२मध्ये विरार-अलिबाग कॉरिडोरची घोषणा केली होती. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून या मार्गिकेचा विकास करण्याची योजना आहे. २0१४ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु पाच वर्षे उलटली तरी त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. परिणामी, या क्षेत्रातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.१२६ कि.मी. लांबीच्या हा कॉरिडोर प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर एक्स्प्रेस वे (एमटीएचएल) व नागपूर समृद्धी एक्स्प्रेस मार्गासह जवळच्या जेएनपीटीला जोडला जाणार आहे. नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, कर्जत, खोपोली, पनवेल, उरण, पेण, वसई, विरार, नालासोपारा,नवघर या शहरांसह अलिबाग, माथेरान आदी ९९६ गावांचा विचार करून एमएमआरडीएने वाहतुकीचा अहवाल तयार केला आहे. विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, रेवस पोर्ट, सिडकोचा नैना प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा मार्ग नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे.
विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.
विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या परिसरात परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.
विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत.

Web Title: The Rocket of the proposed Virar-Alibaug Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.