सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बालाघाटच्या कुशीत असलेल्या कपिलधारवाडी गावात सध्या माळीण (जि.पुणे) दुर्घटनेसारखे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर खचायला सुरुवात झाली असून, अनेक घरांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. गावात येणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे, वाडीतील जवळपास ५०० लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. ‘साहेब, आमचा जीव तर जाणार नाही ना?’ अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पुनर्वसनासाठी अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याचा पाठपुरावाही केला. बांधकाम विभागाला विचारल्यावर ते मंत्रालयात प्रलंबित असल्याचे सांगतात. आमची तेथे ओळख नाही. संदीप नवले, सरपंच
मध्यरात्री १२:३० वाजताच लोक मंदिरातघराला तडे गेल्याचा प्रकार लक्षात येताच मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजता कपिलधारवाडीच्या लोकांनी कपिलधार येथील मंदिरात आश्रय घेतला. प्रशासनानेही तेथे धाव घेत तात्पुरती मदत केली. लोकांना रात्र मंदिरात काढावी लागली.
Web Summary : Kapiladharwadi villagers in Beed fear a Malin-like disaster due to landslides and cracked houses after heavy rain. Despite five years of requesting relocation, government inaction leaves 500 residents in danger, seeking refuge in temples.
Web Summary : भारी बारिश के बाद भूस्खलन और घरों में दरारों से बीड के कपिलधारवाड़ी के ग्रामीण मालिण जैसी आपदा से डरे हुए हैं। पुनर्वास के अनुरोध के बावजूद, सरकारी निष्क्रियता से 500 निवासी खतरे में हैं।