रोडरोमिओंचा उच्छाद

By Admin | Updated: July 1, 2016 01:46 IST2016-07-01T01:46:26+5:302016-07-01T01:46:26+5:30

वेगाने दामटणाऱ्या गाड्या, कर्कश हॉर्न; तसेच शाळा-महाविद्यालयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंमुळे दौड शहरातील नागरिक त्रस्त झाले

Roadromin's Bustle | रोडरोमिओंचा उच्छाद

रोडरोमिओंचा उच्छाद


दौंड : वेगाने दामटणाऱ्या गाड्या, कर्कश हॉर्न; तसेच शाळा-महाविद्यालयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंमुळे दौड शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिकांनी तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
शहरातील सर्वच शाळांच्या परिसरात रोडरोमिओंचे टोळके असतात. विशेषत: सकाळी ६.३0 ते ७ च्या दरम्यान शाळा भरतेवेळी मुख्य रस्त्यांवर बऱ्यापैकी वर्दळ कमी असते. याचा फायदा घेत रोडरोमिओ शालेय विद्यार्थिंनीना लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करतात. पंचायत समिती आणि दौंड नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा परिसर रोडरोमिओंचा अड्डा झाला आहे. एखादी शाळकरी मुलगी येत असेल, तर तिला पाहून अर्वाच्च भाषा वापरणे. अश्लील गाणे म्हणणे, शिट्या वाजविणे असे सर्रासपणे प्रकार सुरू आहेत. तर, काही रोडरोमिओंनी शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पुढे आली आहे. याच परिसरात शाळकरी मुलींच्या सायकली ठेवलेल्या असतात. सायकलीच्या चाकांची हवा काढणे, सायकली नादुरुस्त करणे असेही कृत्य रोडरोमिओंकडून केले जात आहे.
या रोडरोमिओंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, रोडरोमिओंना पोलिसांच्या तावडीतून सोडण्यासाठी हस्तक्षेप होत असेल, तर पोलिसांनी अशा व्यक्तींची नावे जाहीर
करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
चेन स्रॅचिंगचे प्रकार वाढले
सायंकाळच्या सुमाराला रेल्वे कुरकुंभ मोरीकडे विवाहित महिलांचीदेखील छेड काढली जाते. तर, बऱ्याचदा दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुसरीकडे दुचाकीवरून जोरात येणे, महिला किंवा एखाद्या मुलीच्या पाठीमागे दुचाकी जागीच थांबविणे, त्यांच्या डोक्यात टपली मारून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Roadromin's Bustle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.