विरारमधील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 02:45 IST2016-06-27T02:45:43+5:302016-06-27T02:45:43+5:30

विरार पूर्वेकडील मुख्य रस्ता मलनिस्सारण प्रकल्पाच कामासाठी पुन्हा खोदून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याची बाब उजेडात आली

Road to Virar collapses | विरारमधील रस्ता खचला

विरारमधील रस्ता खचला


विरार :कोट्यवधी रुपये खर्चून वर्षभरापूर्वी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेला विरार पूर्वेकडील मुख्य रस्ता मलनिस्सारण प्रकल्पाच कामासाठी पुन्हा खोदून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याची बाब उजेडात आली आहे. पावसाच्या पहिल्याच तडाख्यात हा रस्ता खचून त्यात एक ट्रक अडकून पडला होता.
वसई विरार पालिकेने गेल्यावर्षी गावडवाडी ते मनवेलपाडा रोड पर्यंत सुमारे एक-दीड किलोमीटर लांबीच्या या मुख्य रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसविले होते. पूर्वेकडील हा मुख्य रस्ता असून पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी तीन महिने वाहतूकीचा मार्गही बदलण्यात आला होता.
पेव्हर व्लॉक बसवल्यानंतर विरारकरांचे समाधान झाले होते. तर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून तांत्रिकदृष्टया अनेक चुका केल्याचा आरोपही जाणकारांनी केला होता.
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे सहा महिन्यांनी या रस्त्याच्या मध्यभागी मलनिस्सारण प्रकल्पासाठी गटार खोदून पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ सुरु झाला असून काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.
रस्ता खणून ठेवल्याने वाहतुकीचाही खोळंबा होऊ लागला आहे. शनिवारी दुपारी रेल्वे सब-वे समोर रस्ता खचल्याने त्यात एक ट्रक अडकून पडला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नालासोपारा शहरातील जनजीवन सुरळीत सुुरु झाले. त्यामुळे नागरिकांनी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला.
(प्रतिनिधी)
>जनजीवन सुरू
काल रात्री शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन रस्त्यांवरून वाहतूक सुरळीतपणे सुुरु झाली. काल संध्याकाळी पापडी नजिक मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळून काही काळ
वाहतूक ठप्प झाली होती. हे झाड ट्रान्सफार्मरवर पडल्याने
या भागातील वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला
होता.

Web Title: Road to Virar collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.