शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना साईड मिररची ‘अँलर्जी’!

By admin | Updated: July 26, 2014 22:23 IST

वाहन चालक आपल्या वाहनांना साईड ग्लास लावित नसल्याची बाब ‘लोकमत’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वाशिम : वाहनधारकाला वाहन्न चालवित असताना मागाहून येणार्‍या वाहनांची स्थिती आणि अंदाज कळावा, याकरीता दुचाकी, चारचाकी व इतर मोठया वाहनांदेखिल साईड ग्लास बसविलेले असता. मात्र, आपल्या वाहनाची शोभा जाईल म्हणून अनेक वाहन चालक आपल्या वाहनांना साईड ग्लास लावित नसल्याची बाब 'लोकमत'तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मोटार वाहन कायदयानुसार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणार्‍या कुठल्याही दुचाकी अथवा चारचाकी वाहनाच्या दोन्ही बाजुला, चालकाला मागाहून येणारे वाहन दिसेल, अशा ठिकाणी दोन्ही बाजुने साईड मिरर लावणे अनिवार्य आहे. मात्र फॅशन करण्याच्या नादात तरूण- तरूणीच नव्हे तर जेष्ठांनादेशिल या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यामध्ये सर्वाधिक उल्लंघन करणारे मात्र कॉलेज युवक युवतींचाच समावेश आहे. केवळ आवडत नाही म्हाून अनकांकरवी साईड मिरर काढून ठेवले जातात. एखादी दुर्घटना घडल्यास त्यांचे गंभीर परिणाम रस्त्याने जाणार्‍या इतर नागरिकांनादेखिल भोगावे लागू शकतात. त्यामुळे वैयकितक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर उरणार नाही ना याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात शहरातीलरस्त्यांवर घडणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेवून ह्यलोकमतह्ण ने शहरातील अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना याबाबत काही प्रश्न विचारलेत. नागरिकांच्या आणि वाहतूक पोलीसांच्या नजरेतून अंत्यत क्षुल्ल्क असलेल्या या बाबीचा उहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आलेत. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक फॅशन म्हणून वाहनांना साईड मिरर लावण्याचे टाळतात. तर काही जण याबाबत कारवाई होवू शकते यापासूनच अनभिज्ञ आढळून आलेत. तसेच काही बहाद्दर वाहनधारकांनी तर साईड मिररची आवश्यकताच काय असा प्रतिप्रश्न सुध्दा केला. काहींनी मात्र साईड ग्लास अंत्यत आवश्यक असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. अनेकदा लहान सहान अपघातामुळे तुटफूट झाल्याने साईड मिरर तुटल्यास परवडणारे नसल्याने परत लावण्यासचे टाळले जाते. भरीसभर एका बाजुच्या साईउ मिरर तुटल्यास दुसर्‍या बाजुचा देखिल काढून टाकला जातो. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचे साईड मिरर चोरीला देखिल जातात असे प्रकार शहरात वाढले आहेत. अनेक तरूण-तरूणींकडून केवळ चेहरा न्याहाळण्यासाठीच यांचा वापर केला जातो. नियमांच्या विरोधात जाणार्‍या या सर्व बाबींकडे वाहतूक पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जाते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येत नाही.