कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:33 IST2025-09-24T06:33:07+5:302025-09-24T06:33:40+5:30
ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील.

कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
मुंबई : मुंबईतून कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते जयगड व तिथून पुढे विजयदुर्ग अशा या सेवेचा प्रवास असणार आहे. तिचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे २५ नॉट्स असेल त्यामुळे कमी कालावधीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोचता येईल.
भाऊचा धक्का येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी ही सेवा चालवली जाईल. यासाठी १४७ परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील.
वाहनक्षमता - प्रवासी : ६५६
चारचाकी - ५०
दुचाकी- ३०
प्रवासाचा कालावधी
मुंबई - रत्नागिरी- ३ ते ३.५ तास
मुंबई - सिंधुदुर्ग - ५ ते ५.५ तास
जलद प्रवास
आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. हा जलद प्रवास असेल. ३० वर्षांनंतर पुन्हा ही सेवा सुरू होतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडली होती, अशी प्रतिक्रीया मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली.
प्रवासादरम्यानची जेटी-स्थानके
मुंबई : भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ)
रत्नागिरी : जयगड
सिंधुदुर्ग : विजयदुर्ग
(४० किमीवर बस सुविधा मिळेल)
प्रति प्रवासी भाडे - रु.
फर्स्ट क्लास ९,०००
बिझनेस क्लास ७,५००
प्रीमियम इकॉनॉमी ४,०००
इकॉनॉमी २,५००