शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शकीलच्या मृत्यूच्या अफवेचे पीक, सोशल मीडियावर खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:31 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम आणि त्याचा हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (५७), हे दोघे वेगळे झाल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीची यात भर पडली.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम आणि त्याचा हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (५७), हे दोघे वेगळे झाल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीची यात भर पडली. सोशल मीडियावर दिवसभर या वृत्ताने खळबळ उडवली होती. अशात शकीलच्याच प्रतिक्रियेचा मेसेज आला. अफवा पसरविणा-याचा मी शोध घेत असल्याचे प्रतिक्रियेत नमूद करण्यात आल्याने अफवांचे वादळ थंडावले.‘पहिल्या वृत्तात आयएसआयने छोटा शकीलला ठार केले. त्याचा मृतदेह दोन दिवस शवागरामध्ये ठेवल्यानंतर विमानाने कराची येथे नेण्यात आला आणि तेथेच त्याचा दफनविधी पार पडला, असे म्हटले होते. तर दुसºया वृत्तात शकील कराचीमध्ये त्याची दुसरी बायको आयेशासोबत राहतो. ६ जानेवारीला इस्लामाबाद येथे साथीदारांना भेटण्यासाठी गेला असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला,’ असे सांगण्यात आले.बुधवार सकाळपासून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांपासून अन्य अधिकाºयांच्या मोबाइलवर या वृत्तासंदर्भातील संदेश येत होते. त्यात माध्यमांच्या ग्रुपवरही या संदेशाने खळबळ उडवली. सोशल मीडियावर या वृत्ताच्या सविस्तर माहितीने नानाविध चर्चा रंगल्या. या वृत्ताबाबत तपास यंत्रणांकडून काहीच माहिती येत नसल्यामुळे या अफवा वाढत होत्या. अखेर छोटा शकीलची प्रतिक्रिया व्हायरल झाल्याने या अफवांचे वादळ थंडावले.‘माझ्या नावाने व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधील आवाज माझा आहे की नाही, हे तपास यंत्रणांनी शोधावे. माझ्या मृत्यूबाबत अफवा पसरवित असलेल्या व्यक्तीचा मी स्वत: शोध घेत आहे’, असे या प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले होते. मात्र, या दिवसभराच्या वृत्ताबाबत मुंबई पोलीस दल, तसेच तपास यंत्रणांकडून काहीही माहिती समोर आलेली नाही.अफवा पसरविणा-याचा शोध घेत आहे-छोटा शकीलच्या मृत्यूच्या अफवेने सर्वत्र खळबळ उडाली आणि त्याची दखल थेट छोटा शकीलनेच घेतली.अफवा पसरविणा-याचा मी शोध घेत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. त्यानंतर अफवांचे वादळ थंडावले.

टॅग्स :Chhota Shakeelछोटा शकीलMumbaiमुंबईSocial Mediaसोशल मीडिया