जळगावात कारवाई विरोधात रिक्षा बंद आंदोलन
By Admin | Updated: August 5, 2016 16:49 IST2016-08-05T16:49:02+5:302016-08-05T16:49:02+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात असल्याने त्याविरोधात रिक्षा चालक शुक्रवारी आक्रमक झाले.

जळगावात कारवाई विरोधात रिक्षा बंद आंदोलन
चर्चेनंतर दुपारी आंदोलन मागे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ : वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात असल्याने त्याविरोधात रिक्षा चालक शुक्रवारी आक्रमक झाले. रिक्षा चालकांना गणवेश शिवणे, परवाना नूतनीकरण करणे, अशा कामांसाठी काही दिवसांची मुदत द्यावी तसेच जप्त केलेल्या रिक्षा दंडात्मक कारवाई करून तत्काळ परत द्याव्यात, या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. परंतु वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनांवर कारवाई सुरू आहे. रिक्षा चालकांनी कागदपत्रे सादर करून नियमानुसार दंड भरला तर तत्काळ वाहने सोडली जातील. ज्या वाहनांची कागदपत्रे नसतील, ते जप्त केले जातील. -अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, जळगाव.