नाशिकमध्ये महिलेला रिक्षाचालकाने केली बेदम मारहाण; बलात्कार केल्याचाही आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:33 IST2017-09-12T13:33:12+5:302017-09-12T13:33:12+5:30
परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेला एका रिक्षाचालकाने बेदम मारहाण करून तिला जबरीने रिक्षात बसवून आडगाव नाका बस स्टँन्ड मागे नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे.

नाशिकमध्ये महिलेला रिक्षाचालकाने केली बेदम मारहाण; बलात्कार केल्याचाही आरोप
नाशिक, दि. 12 - परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेला एका रिक्षाचालकाने बेदम मारहाण करून तिला जबरीने रिक्षात बसवून आडगाव नाका बस स्टँन्ड मागे नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे. रविवारी (10 सप्टेंबर) दुपारी ही घडना घडली असल्याचं समजतं आहे.
या घटनेनंतर संशयित नराधम रिक्षाचालकाने सोमवार (11 सप्टेंबर) दुपारी ४ वाजता पुन्हा परिसरात राहणाऱ्या त्या महिलेला गाठून पंचवटी बस डेपो मागे नेऊन जबरीने बलात्काराचा प्रयत्न केला मात्र पिडीत महिलेने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणानंतर महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पंचवटी पोलिसांना दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार त्या अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.