शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएससी' तर्फे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, येत्या १३ सप्टेंबरला होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:55 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल - मे आयोजित होणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या..

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकललेल्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ,विद्यार्थ्यांची मागणी

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढे ढकलण्यात आलेल्या विविध परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १३ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.

 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन एमपीएससीतर्फे एप्रिल-मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.  परंतु ,राज्य शासनातर्फे बहुतांश गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकललेल्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ' राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १३ सप्टेंबर रोजी तर ' महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०' येत्या ११ ऑक्टोबर रोजी आणि ' महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.-----------------पुण्यासह विविध शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी कोरोनामुळे आपल्या गावी गेले आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुणे हे परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु , विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळील परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा देता यावी,  यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षणState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस