शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा 'पॉवर प्ले' यशस्वी; पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, ११ जिल्ह्यांना नवे 'पालक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:08 IST

Maharashtra Government : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

मुंबई - राज्य सरकारमधील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचे खोळंबलेले वाटप यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभा करत अजित पवार हे जुलै महिन्याच्या सुरुवातीला अनेक आमदारांना सोबत घेत महायुती सरकारमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. त्यावेळी अजित पवार गटाला ९ मंत्रिपदे मिळाली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा तसेच कायदेशीर पेचप्रसंग यामुळे पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचंही वाटप होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेरीस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप करत सुधारित यादी जाहीर केली आहे. 

सुधारित यादीमध्ये अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अकोला, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बुलढाणा, हसन मुश्रिफ यांच्याकडे कोल्हापूर, धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, अनिल पाटील यांच्याकडे नंदूरबार जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 

सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेchandrakant patilचंद्रकांत पाटील