शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात तक्रारींचा पाढा, विदर्भातील नेत्यांची थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 07:29 IST

दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.  

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी याच निवडणुकीवरून विदर्भातील काँग्रेसचे नेते विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हा संघर्ष तीव्र झाला आहे. पटोले यांनी या निवडणुकीत घातलेल्या गोंधळाबाबत विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असून लवकरच हे नेते दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.  विदर्भात काँग्रेससाठी चांगली परिस्थिती असताना पटोले पक्षांतर्गत वितुष्ट आणत असल्याची तक्रार विदर्भातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत पटोले यांनी आधी गंगाधर नाकाडे आणि नंतर राजेश झाडे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र स्थानिक नेते आणि पदाधिकारी सुधाकर अडबाले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. तर पटोलेंचा अडबालेंच्या नावाला विरोध असल्याने त्यांनी अडबालेंना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे विदर्भातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा केली. नागपूर विधानपरिषद निवडणुकीतही पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित छोटू भोयर यांना पक्षात आणून उमेदवारी दिली आणि ऐन निवडणुकीत भोयर गायब झाले. त्या प्रकरणातही पटोलेंवर पक्षाकडून कारवाई झाली नसल्याचे नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे.  काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी “आज सकाळी फोन आला, ‘ताई आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे, की नानांच्या?’ आता काय उत्तर देऊ कप्पाळ?” असे ट्वीट करत पक्षातील परिस्थिती समोर आणली आहे.  

प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे अशक्य - थोरात  बाळासाहेब थोरात यांनीही पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांबरोबर काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील सत्यजित तांबे यांच्या एबी फॉर्मच्या घोळाचे खापर पटोले यांनी अप्रत्यक्षपणे थोरात यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या थोरातांची पटोले यांच्याविरोधातील नाराजी वाढली आहे.  

मी कुरघोडीचे राजकारण करत नाही : पटोलेथोरात यांनी पाठविलेल्या पत्राबाबत आपल्याला माहिती नसल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच, मी कुरघोडीचे राजकारण करत नाही, असे सांगतानाच नागपूर, अमरावती येथे भाजपचा पराभव झाला त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने रचलेला हा खेळ आहे, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात