शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ! मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:09 IST

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.

 औरंगाबाद - मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.८ ते ९ जुलैदरम्यान ५० ते ७५ मि. मी. दरम्यान पाऊस होईल व त्यानंतरचे पुढील तीन दिवस २५ ते ५० मि. मी. दरम्यानच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मुंबई व कोकण किनारपट्टीसह विदर्भातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल आणि मध्य मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याने गृहीत धरले होते. घडले भलतेच.हवामान खात्याचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, गोवा, कोकण, मुंबई, विदर्भ भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा दोन दिवसांपासून स्थिर आहे. तो पट्टा पुढे सरकेल याचे अनुमान हवामान खात्याने लावले होते. परंतु तसे काहीही झाले नाही. परिणामी दोन दिवस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवसदेखील अशीच स्थिती राहू शकते.२०२ मंडळांत पावसाची कृपाजून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ५० टक्के मंडळांवर पावसाची कृपा राहिली. विभागातील ५० टक्के भूभाग पावसाच्या कृपादृष्टीने चिंब झाला असला तरी अनेक मंडळांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ७ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची तारीख असली तरी जूनअखेरीस मान्सून सक्रिय झाला. २५ टक्केही पाऊस न झालेल्या ५ मंडळांत औरंगाबादच्या ३ मंडळांचा समावेश आहे. यात जालना आणि बीडमधील प्रत्यके १ मंडळ आहे. २० गावांमागे १ तर एका तालुक्यात ५ सर्कलचे सरासरी प्रमाण आहे. मराठवाड्यात ८ हजार ५२२ गावे आहेत. विभागातील ९२ मंडळांत ७५ ते १०० टक्केदरम्यान तर ८१ मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. ४१ मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला. मराठवाड्यात ४२१ मंडळांत पावसाची नोंद होते. 

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस