परतीच्या पावसाची हजेरी
By Admin | Updated: September 10, 2015 04:47 IST2015-09-10T04:47:47+5:302015-09-10T04:47:47+5:30
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने गेल्या २४ तासांत कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हजेरी लावली. शिवाय येत्या दोन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात

परतीच्या पावसाची हजेरी
पुणे/मुंबई : परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने गेल्या २४ तासांत कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हजेरी लावली. शिवाय येत्या दोन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मध्य भारतात पुन्हा मान्सून सक्रिय
हवामान खात्याचे महासंचालक एल. एस. राठोड यांनी सांगितले, की दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात बुधवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. या भागांत आणखी पाऊस पडेल.
देशाच्या दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुढील २४ तासांत मुंबईतही चांगला पाऊस अपेक्षित आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.