राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:05 AM2020-10-11T02:05:36+5:302020-10-11T06:53:00+5:30

विदर्भ व मराठवाड्यातही दुपारनंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. सोंगणीला आलेल्या सोयाबीन उडीद पिकाचे यामुळे नुकसान झाले.

The return rain to the state; Western Maharashtra, including Pune | राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपले

राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपले

Next

मुंबई/पुणे : राज्याला शनिवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी चार दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत शनिवारी दुपारपर्यंत आकाश स्वच्छ होते. दुपारनंतर ढग जमून गडगडाट होऊन त्यापाठोपाठ मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. उपनगरातही जोरदार पाऊस पडला. पुणे शहरात अर्ध्या तासात तब्बल ११.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ढगफुटीसारखा झालेल्या पावसाने अनेक ठिकाणांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोल्हापूर सांगली, सातारा, आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून आष्टा (जि. सांगली) येथे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विदर्भ व मराठवाड्यातही दुपारनंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. सोंगणीला आलेल्या सोयाबीन उडीद पिकाचे यामुळे नुकसान झाले.

प्रमुख शहरांत झालेला पाऊस
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रमुख शहरात पडलेला पाऊस : पुणे ११.Þ६, कोल्हापूर १६, सांगली ११, सोलापूर १४, सातारा ४, पणजी २, औरंगाबाद १३ मिमी पावसाची नोंद झाली होती

Web Title: The return rain to the state; Western Maharashtra, including Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस