भलत्यानेच काढलेले पैसे खातेदारास परत
By Admin | Updated: November 28, 2014 00:05 IST2014-11-28T00:05:35+5:302014-11-28T00:05:35+5:30
खातेदाराच्या खात्यात असलेली संपूर्ण रक्कम भलत्याच व्यक्तीने दोन महिन्याच्या काळात एटीएमवरून काढून घेण्यास बँकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे,

भलत्यानेच काढलेले पैसे खातेदारास परत
बँक ऑफ इंडियाला दणका : ग्राहक न्यायालयाचा निष्काळजीपणाचा ठपका
मुंबई : खातेदाराच्या खात्यात असलेली संपूर्ण रक्कम भलत्याच व्यक्तीने दोन महिन्याच्या काळात एटीएमवरून काढून घेण्यास बँकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष काढून राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ही रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात 9 टक्के व्याजासह पुन्हा जमा करण्याचा आदेश बँक ऑफ इंडियाला दिला आहे.
सतना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व मध्य प्रदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध बँक ऑफ इंडियाने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे न्यायिक सदस्य व्ही. के. जैन यांनी हा आदेश दिला.
खाते उघडल्यावर त्या खात्याचे एटीएम कार्ड व त्या कार्डाचा एटीएम पिन त्या खातेदारालाच दिल्याचे बँक सिद्ध करू शकली नाही. परिणामी एटीएम कार्ड व त्याचा पिन भलत्याच व्यक्तीच्या हाती जाण्यास व त्या व्यक्तीने खात्यातील सर्व रक्कम एटीएममधून काढून घेण्यास बँक ऑफ इंडियाच जबाबदार ठरते, असे राष्ट्रीय आयोगाने नमूद केले.
सतना जिल्ह्यातील नजिराबाद येथील श्रीमती बिल्किस बानो यांनी या संबंधीची मूळ फिर्याद केली होती. त्यांच्या खात्यात 4 लाख 36,433 रुपयांची रक्कम शिल्लक होती. 22 जून 2क्क्9 रोजी त्या काही रक्कम काढण्यासाठी बँकेत गेल्या असता त्यांच्या खात्यात काहीही रक्कम शिल्लक नसल्याचे बँकेने त्यांना सांगितले. बिल्किस बानो यांनी आपल्या खात्याचे स्टेटमेंट घेतले असता 2क् एप्रिल 2क्क्9 ते 18 जून 2क्क्9 या दोन महिन्यांच्या काळात खात्यातील रक्कम एटीएमवरून टप्प्याटप्प्याने काढली गेल्याचे निदर्शनास आले.
बँकेने आपल्याला संबंधित खात्याचे एटीएम कार्ड व त्याचा पिन कधी दिलाच नाही. तरीही खात्यातील रक्कम एटीएम कार्ड वापरून कोणी व कशी काढली, असा मुद्दा घेऊन बिल्किस बानो यांनी फिर्याद दाखल केली. न्यायालयात बँक ऑफ इंडियाने असा लबाडीचा बचाव घेतला की, या खात्याचे एटीएम कार्ड घेण्यासाठी खातेदाराने आपला अधिकृत प्रतिनिधी पाठविला होता व त्याच्याकडे कार्ड सुपूर्द केले गेले होते. तसेच या एटीएम कार्डाचा पिन बिल्किस बानो यांना घरी पाठविण्यात आला होता.
या उप्पर बँकेचे असेही म्हणणो होते की, बिल्किस बानो यांच्याच एका सहका:याने एटीएममधून पैसे काढले. परंतु एटीएमवर हे व्यवहार करताना त्याने डोके व चेहरा झाकून घेतला होता त्यामुळे त्याची ओळख पटू शकत नाही. (विशेष प्रतिनिधी)
4बँकेचा हा न पटणारा बचाव अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, खात्याचे एटीएम कार्ड खातेदाराने पाठविलेल्या अधिकृत प्रतिनिधीकडे सुपूर्द केले, असे बँक म्हणते. परंतु त्यासाठी त्या प्रतिनिधीने दिलेले खातेदाराचे अधिकारपत्र बँकेकडे नाही. तसेच एटीएम कार्डाचा पिन खातेदारास घरच्या पत्त्यावर पाठविला होता व तो त्यास मिळला याची पोचपावतीही बँक सादर करू शकली नाही.
4परिणामी एटीएम कार्ड व त्याचा पिन भलत्याच व्यक्तीच्या हाती पडण्यास व खात्यातील रक्कम भलत्याच व्यक्तीने परस्पर काढून घेण्यास बँकेचा निष्काळजीपणाच सर्वस्वी जबाबदार आहे.