शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय आता ६२ वर्ष; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:03 IST

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला.

ठळक मुद्देबुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झालीराज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यतासार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देणार

मुंबई – मागील एक वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागातील त्रुटींची प्रखरतेने जाणीव झाली. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अनेकांचे प्राण गेले. कोरोना महामारीनं आरोग्य या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. त्यामुळे अनेक देश आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देत आहेत.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. अनेक पदं रिक्त असल्याने सक्रीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी निवृत्त होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत याच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.

आजच्या मंत्रिमंडळात ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता

राज्यातील सार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार

कोविड सादरीकरण

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अलीकडेच झालेल्या बैठकीत म्हटलं होतं.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेHealthआरोग्यMedicalवैद्यकीय