दहावीचा निकाल पुढील आठवड्यात: गंगाधर म्हमाणे

By Admin | Updated: June 6, 2017 21:49 IST2017-06-06T21:49:44+5:302017-06-06T21:49:44+5:30

राज्यातील १२वीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

The results of the Class X results next week: Gangadhar said | दहावीचा निकाल पुढील आठवड्यात: गंगाधर म्हमाणे

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात: गंगाधर म्हमाणे

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - राज्यातील १२वीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, दहावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार असल्याने सोशल मिडियावर निकालाबाबत फिरणा-या तारखा अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
इयत्ता बारावीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी व पालकांना उत्सुकता लागून राहिली आहे. सोशल मिडियावर दहावीच्या निकालाच्या विविध तारखा फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर म्हमाणे यांनी या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची अधिकृत तारीख मंडळाकडून जाहीर केली जाईल, असं ते म्हणाले.
 
2017 साली घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 17,66, 098 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017 या कालावधीत घेण्यात आली होती.

Web Title: The results of the Class X results next week: Gangadhar said