बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी
By Admin | Updated: May 30, 2014 01:43 IST2014-05-30T01:43:26+5:302014-05-30T01:43:26+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल़

बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी
मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल़ विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १० जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या महाविद्यालयांत मिळतील़ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊट काढता येईल़ त्याचप्रमाणे मोबाइलवरून एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल कळू शकेल़ गुणांची पडताळणी करण्यासाठी २० जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल़ विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)