पालघर जिल्ह्याचा ९२ टक्के निकाल
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
८ तालुक्यातील शाळांमधेन परिक्षेला बसलेल्या ४३ हजार ७६१ विद्यार्थ्यांपैकी ४० हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पालघर जिल्ह्याचा ९२ टक्के निकाल
हितेन नाईक,
पालघर- या जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.७४ टक्के लागला असून ८ तालुक्यातील शाळांमधेन परिक्षेला बसलेल्या ४३ हजार ७६१ विद्यार्थ्यांपैकी ४० हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींनी बाजी मारली आहे. विक्रमगड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६ टक्के तर सर्वात कमी निकाल तलासरी तालुक्याचा ८६.५३ टक्के लागला आहे. महत्वाचे म्हणजे ८ तालुक्यात ११८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यात वसईतील सर्वाधिक ७० शाळांचा समावेश आहे
मुंबई बोर्डाच्या निकालामध्ये पालघर जिल्हयाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. वाडा तालुक्यातून ३२ शाळामधून २ हजार ८४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल ८९.५३ टक्के लागला या तालुक्यातील गुरुदेव चैतन्यस्वरुप हायस्कूल वाडा, एसएफ पाटील विद्यालय आबीटघर (वाडा) नॅशनल इंग्लीश स्कूल कुडूस, लिटल एंजल इंग्लीश मिडीयम स्कूल वाडा, प्रगत विघ्नेश माध्यमिक विद्यालय रावते पाडा, इ. पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
मोखाडा तालुक्यातून १८ शाळामधून १ हजार १६५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल सर्वाधीक ९६.०० टक्के लागला आहे. या तालुक्यातून एकमेव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा असलेल्या गोंडे बुद्रुक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. विक्रमगड तालुक्यातील २३ शाळांमधून २ हजार ५० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.०० टक्के लागला आहे. या तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा विक्रमगड,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, भोपोली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरबाड (विक्रमगड) आदर्श विद्यालय उटावली, केव विभाग हायस्कूल, विक्रमगड शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साखरे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कुर्झे (धगडीवाडा), एस. जी. एम. भडांगे विद्यालय,वाकी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विक्रमगड, इ. सह दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
जव्हार तालुक्यातून २५ शाळामधून १ हजार ७१० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल ९४.१५ टक्के लागला तालुक्यातील भारती विद्यापीठ हायस्कूल जव्हार, वडोली हायस्कूल, वडेली देहरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दाभोसा, साखरशेत माध्यमिक आश्रमशाळा, चांभारशेत, एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा, हिरपाडा, या सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तलासरी तालुक्यातून २१ शाळामधून २ हजार ४२ विद्यार्थी परिक्षेल बसले होते त्यापैकी १६ हजार ७६७ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल ८६.५३ टक्के लागला आहे. तालुक्यातुन जे.डी राणा हायस्कूल, घिमाणीया, तलासरी, एम.बी.बी. आय. एज्युकेशन अॅकेडमी, तलासिरी, कस्तुरबा गांधी, बालिका विद्यालय या तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागाला आहे.
डहाणू तालुक्यातून ४ हजार ३३७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी ३२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८७.५५ टक्के लागला आहे. तालुक्यातील एसटी मेरी हायस्कूल डहाणू रोड, एसडी इराणी अकॅडमी स्कूल, सरावली, बी. एम. ठाकूर हायस्कूल, वाणगाव, एचएम पारेख हायस्कूल, मसाली इ. चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
>पालघर तालुक्याचा निकाल ९२ टक्के
पालघर तालुक्यातून ६ हजार ७७५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ६ हजार २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९२.टक्के लागला आहे. तालुक्यातून स्वा. नरोत्तम पाटील विद्यालय, सातिवली-दहिसर (पालघर), ग्रामीण विद्यालय नावझे, स्व. विद्या विनोद अधिकारी, विद्यालय लालोंडे, व्टिकंल स्टार इंग्लीश स्कूल पालघर, डॉ. स. दा. वर्तक विद्यालय मराठी बोईसर, डॉ. स.दा. वर्तक विद्यालय हिंदी, ज्योतीदिप हिंदी हायस्कूल पालघर, आदर्श विद्यामंदीर केळवे, आनंद आश्रम कॉन्व्हेंन्ट हायस्कूल पालघर, होली स्पीरीट हायस्कूल, पालघर, श्री विद्या इंग्लीश मिडीयम स्कूल सरावली, सॅक्रेड हार्ट इंग्लीश हायस्कूल पालघर, ग्रामीण शिक्षण संस्थेचे इंग्लीश मिडीयम स्कूल सफाळे, चिराग विद्यालय भीमनगर, बोईसर, अथर्व अॅकेडमी इंग्लीश मिडीयम काटकर पाडा, बोईसर, ड्रीमलॅन्ड पब्लीक हायस्कूल, सालवड, अली अलाना इंग्लीश हायस्कूल मनोर, आर्यन एज्युकेशन सोसायटी इंग्लीश हायस्कूल पालघर.