शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:37 IST

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी अाॅनलाईन जाहीर करण्यात येणार अाहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, अशी माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

     मंडळमार्फत दि. १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधी इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. काही दिवसांपुर्वीच इयत्ता बारावीचा निकाल लागल्याने दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर उपलब्ध विषयनिहाय गुणांच्या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. गुणांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ३० आॅगस्ट ते ८ सप्टेबर या कालावधीत विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. १८ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. दोन्ही अर्जांसोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    उत्तरपत्रिककांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागेल. छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करणे गरजेचे आहे. या परीक्षेत सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत मार्च २०१९ मध्ये होणारी परीक्षा देता येईल. मार्च २०१९ मध्ये होणारी परीक्षा देऊ इच्छिणारे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसणारे व अन्य विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.-----------निकालासाठी संकेतस्थळ - www.mahresult.nic.in

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळStudentविद्यार्थी