राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू- बनवारीलाल पुरोहित

By Admin | Updated: August 17, 2016 19:56 IST2016-08-17T19:56:01+5:302016-08-17T19:56:01+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बनवारीलाल पुरोहित आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली

The responsibility of the governor to cross the border - Banwarilal Purohit | राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू- बनवारीलाल पुरोहित

राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू- बनवारीलाल पुरोहित

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बनवारीलाल पुरोहित आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. पक्षाने विश्वासाने सोपविलेली ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांनी बुधवारी व्यक्त केला. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते, याची मला जाणीव आहे. आजवरील आयुष्य सार्वजनिक जीवनात गेले. आता पुन्हा पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. पुरोहित यांनी नागपूर लोकसभा मतदार संघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले.
दोनदा काँग्रेसचे सदस्य म्हणून तर एकदा भाजपचे सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. पुरोहित यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: The responsibility of the governor to cross the border - Banwarilal Purohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.