‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमास प्रतिसाद
By Admin | Updated: August 24, 2016 02:56 IST2016-08-24T02:56:34+5:302016-08-24T02:56:34+5:30
‘लोकमत आपल्या दारी’ या लोकमत समूहाच्या उपक्रमास मंगळवारी रोहेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमास प्रतिसाद
रोहा : ‘लोकमत आपल्या दारी’ या लोकमत समूहाच्या उपक्रमास मंगळवारी रोहेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांवरील चर्चेत नागरिकांनी सहभाग घेत आपला तालुका आणि गावाच्या सार्वजनिक हिताचे अनेक प्रश्न यावेळी मांडले. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले रोहेकर आणि तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी या उभयतांमध्ये आपल्या गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेली तळमळ दिसून आली, तर लोकमत समूहाने घेतलेला हा कार्यक्रम लोकांसाठी उपयुक्त असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी तालुक्यातील व शहरातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत योजनेतील शौचालये, वाहतूक समस्या, कोलाड, धाटाव, चणेरा परिसरातील वाढते गावठी दारूचे धंदे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कालव्याला नसलेले पाणी, एमआयडीसीतील प्रदूषण आणि प्रदूषणाबाबत मिळणारी भरपाई, कामगार वाहतूक करणाऱ्या बसेस अशा विविध प्रश्नांवर यावेळी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माने चर्चा घडवून आणली.
रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास रोहा तहसीलदार सुरेश काशिद, नगराध्यक्ष समीर शेडगे, पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले, उपनगराध्यक्ष जितेंद्र पडवळ, रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, रोहा पो. नि. मेश्राम, महावितरणचे वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे घाडगे, पंचायत समितीचे महामुनी आदींसह माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह, नगरसेविका प्राजक्ता चव्हाण, अल्ताफ चोरढेकर, अप्पा शेडगे, मितेश कल्याणी यांच्यासह तालुका तसेच शहरातील अनेक ज्येष्ठ मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे यांनी उपक्र मात सहभाग दिला.
>विविध समस्या
शहरात काही ठिकाणी असलेली अस्वच्छता, केमिकल प्रक्रि यायुक्त मिळत असलेली फळे आणि भाजीपाला, नवीन पुलाचे निकृ ष्ट बांधकाम तसेच पूल पादचाऱ्यांना चालण्यासाठी खुला करावा, सणांदरम्यान रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून घोसाळे तसेच चणेरा विभागात जाण्यासाठी गाड्या सोडण्यात याव्यात.