Resolve the question of fixed size of electricity bills of industries says Sharad Pawar | उद्योगांच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू; शरद पवार यांची ग्वाही

उद्योगांच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू; शरद पवार यांची ग्वाही

कोल्हापूर : उद्योगांच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कºहाड येथे कोल्हापुरातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिली.

कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची भेट घेतली. औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांना स्थगिती दिलेल्या महिन्यांतील स्थिर आकार या महिन्यातील बिलामध्ये लावून आल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे स्थिर आकार रद्द करून वीज बिल दरवाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करून त्याबाबतचे निवेदन दिले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी स्थिर आकाराचा मुद्दा जाणून घेतला. सकारात्मक चर्चा केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Resolve the question of fixed size of electricity bills of industries says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.