शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांकडून संकल्पांचा पाऊस

By admin | Updated: March 10, 2015 01:58 IST

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात

मुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात दुष्काळी आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगत विविध क्षेत्रात सरकार हाती घेणार असलेल्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे सांंगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील स्मारक, लंडनमधील घर शासनाने विकत घेणे, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथील स्मारक उभारण्यास शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नव्हता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरु केले आहे. प्रत्येक वर्षी ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४०० कोटी रु.चे कर्ज नाबार्डकडून घेतले जाईल. पाण्याची मागणी व सिंचनेतर पाणी वापरकर्त्यांना शासनाची मंजुरी देणे या सुविधा आॅनलाइन करण्यात येतील. येत्या वर्षांत ग्रामीण भागात १४ लाख ५० हजार प्रसाधनगृहे बांधण्यात येतील. पीक विमा योजनेची व्यापी पुढील वर्षी वाढविली जाईल,मेळघाट व नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दल निर्माण करण्यात येईल, असे राज्यपाल म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताली ६०० चौ.कि.मी.च्या क्षेत्रात ‘नयना’ हे नवीन अत्याधुनिक शहर उभारण्याचे ठरविले आहे.राज्यात ३० स्मार्ट शहरे उभारण्या येतील. राज्याला औद्योगिक, पर्यटन व सेवा क्षेत्रातील प्रकल्पांची कामे हाती घेण्यासाठी एमएसआरडीसी इंडिया इंटरनॅशनल अशी शासकीय कंपनी स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या ९० आठवड्यांमध्ये पूर्ण केले जाईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत माझे शासन अत्यंत गंभीर व संवेदनशील असून या प्रश्नावर प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा सक्रि य पाठपुरावा करून त्याद्वारे वादग्रस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे ते म्हणाले.