Resolution of Gondwana Gorewada International Zoological Park in the public meeting of tribal organizations | …अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला

…अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला

नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नामकरण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होत असताना दुसरीकडे आदिवासी संघटनांच्या जनसभेत या विषयावरून प्रचंड आक्रोश सुरू होता. तब्बल चार तास चाललेल्या या जनसभेत गोंडवाना-गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय असा ठराव मंजूर करून या नावानेच पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा मुंबईत झाल्यापासूनच नागपूरसह विदर्भातील आदिवासी समाज संघटना आणि नागरिकांकडून विरोध सुरू आहे. सोमवारी नामकरण समारंभाचे औचित्य साधून येथील राजे भक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यासमोर जनसभा झाली. त्यात  हा ठराव घेण्यात आला.

माजी महापौर मायाताई इवनाते यांच्या पुढाकारातून झालेल्या या सभेला आ. डॉ. अशोक उईके, आ. डॉक्टर संदीप धुर्वे, आ. डॉ. देवराव होळी, राजे वीरेंद्र शहा ऊईके, माजी आमदार संजय पुराम, अरविंद गेडाम, प्रभुदास भिलवेकर, रमेश मावसकर, मधुकर उईके, दिनेश शेराम, हरि उईके,  अमित कोवे, राजेंद्र मरस्कोल्हे, एम.एम. आत्राम, प्रकाश गेडाम, रंजीता कोडापे, आकाश मडावी, विवेक नागभिडे आदी उपस्थित होते.

काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौरा प्रसंगी विमानतळ ते प्रकल्प यादरम्यान  काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची योजना आंदोलकांनी आखली होती.  यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होती. दरम्यान काटोल नाक्यावर काही युवकांनी गोळा होऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याची तयारी चालवली. मात्र पोलिसांच्या लक्षात येताच सर्वांना ताब्यात घेऊन हा प्रयत्न हाणून पडला.

मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रण
प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यावर मुख्यमंत्री आंदोलकांच्या पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतील, असा निरोप पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सभा स्थळापर्यंत पोचवण्यात आला. मायाताई इवनाते यांच्याकडे हा निरोप गेला, मात्र व्यासपीठावरील नेत्यांनी आणि इवनाते यांनी  या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. शिष्टमंडळ भेटीला जाणार नाही.  परंतु मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी येऊन सर्व समाज बांधवांची संवाद साधावा, अशी भूमिका  मांडण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Resolution of Gondwana Gorewada International Zoological Park in the public meeting of tribal organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.