शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार, ओबीसी समाजालाही करणार आश्वस्त; संतुलनासाठी सरकारची कसरत

By यदू जोशी | Updated: November 26, 2023 07:06 IST

Maratha Reservation : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

- यदु जोशीमुंबई : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही ठरावाद्वारे मांडली जाण्याची शक्यता आहे.

आरक्षणावरून नागपूरचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. पहिल्या दिवशी दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज संपेल. दुसऱ्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय सदस्यांची एकमुखी संमती असल्याचा ठराव सभागृहाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत मांडतील. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा ठराव मांडतील, असे सूत्रांनी सांगितले. ठरावात ओबीसींना आश्वस्त करणारी भूमिकादेखील घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

या मुद्द्यांवर सरकार काय करणार? - मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारा अहवाल प्राप्त करून त्या आधारे या समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षण देणार का? - असे आरक्षण देणारा अध्यादेश जारी करणार का? - जातनिहाय सर्वेक्षण महाराष्ट्रात करणार का? आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा केंद्र सरकारने वाढवावी असा ठराव विधिमंडळात करणार का? 

‘लोकमतच्या’ वृत्ताचे तीव्र पडसादओबीसी आणि धनगर समाजाच्या कल्याणाच्या अनेक योजना वित्त विभागात अडल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बबनराव तायवाडे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपापल्या मागण्यांसंदर्भात सरकारला घेरण्याचा इशारा दिला.

काय होईल अधिवेशनात?मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारने काय-काय केले, यासंबंधीची माहिती शिंदे-फडणवीस देतील. त्याचवेळी आंतरवली सराटीतील पोलिस लाठीमार आणि आंदोलनाच्या काळात झालेल्या हिंसक घटनांवरून विरोधी पक्ष सरकारला घेरतील. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होऊन तीत अधिवेशनासाठीची रणनीती ठरवली जाणार आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, अशी भूमिका विरोधक मांडण्याची शक्यता आहे.

धनगर समाजाला कसे शांत करणार?ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, अशा मराठा समाजातील व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा न्या. संदीप शिंदे समितीने या आधीच अंतरिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. समितीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. अंतरिम अहवालात नमूद बाबी विधिमंडळात मांडल्या जाण्याची शक्यता आहे. या आधीही विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठराव करण्यात आला होता.धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावे, अशी या समाजाची मागणी आहे. त्यासाठी हा समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. अशावेळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल. त्यातच धनगर समाजाला अनुसूचित जातीतून आरक्षण देण्यास आदिवासी संघटनांनी विरोध सुरू केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन