शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'राजीनामा द्या, अन्यथा तुमचा बाबा सिद्दिकी करू', योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:45 IST

मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या फातिमा खान नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'दहा दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला बाबा सिद्दिकीप्रमाणे मारुन टाकू' असा धमकीचा मेसेज मुंबई पोलीस कंट्रोल रुमला पाठवण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले अन् धमकी देणाऱ्या महिलेला पोलीस आणि एटीएसने ताब्यात घेतले.

ही महिला सुशिक्षित असून, मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी महिलेने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात मेसेज केला होता की, योगी आदित्यनथ यांनी 10 दिवसांत राजीनामा दिला नाही, तर आम्ही त्यांना बाबा सिद्दीकीप्रमाणे मारून टाकू. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस, ठाणे पोलिस आणि मुंबईचे वरळी पोलिस तपासात गुंतले. संयुक्त तपासात ही महिला उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. फातिमा खान असे तिचे नाव आहे.

एटीएसने पोलिसांसह सुरुवातीला महिलेच्या घरी पोहोचून तिची चौकशी केली. यानंतर तिला स्थानिक पोलीस ठाण्यात आणून तिथेही चौकशी करण्यात आली. त्यानंतर वरळी पोलीस तिला घेऊन मुंबईत आले, मात्र महिलेला अद्याप अटक झाली नाही, असे मुंबईच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे. महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसिक तपासणीही केली जाणार आहे.

योगींचा महाराष्ट्र दौरादरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या राज्यभर 15 सभा होणार असून, याबाबत महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथMumbaiमुंबईPoliceपोलिस